महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित

Emblem of India
नवीन बातम्या
Extension - E-Tender for - Shabari Adi Paryatan    |    Corrigendum - E-Tender for - Internal Audit of MSCTDC    |    E-Tender for - Appointment of CA firm for Day to Day Activitie of MSCTDC    |    E-Tender for - Internal Audit of MSCTDC    |    12.06.2025 उपविधीदुरुस्ती बाबत    |    आदिवासी विकास महामंडळाची मतदार यादी    |    जाहिरात - शबरी महामंडळाअंतर्गत सल्लगार वित्त या पदासाठी walk in interview - दिनांक - २५ सप्टेंबर २०२५.    |    विधी सल्लागार पद - निवड यादी    |    विधी सल्लागार पद कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठीची जाहिरात.    |    आदिवासी विकास महामंडळामार्फत प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत पालघर व ठाणे जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांकडुन धानाची खरेदी करण्यात आलेली आहे, अशा शेतकऱ्यांची ऑनलाईन तपासणी व सादर केलेले दस्तऐवजांची तपासणी केली असता वरील प्रमाणे त्रृटी निदर्शनास आलेल्या आहेत. वरील शेतकऱ्यांनी ज्या केंद्रावर धान विक्री केली आहे त्या केंद्रावर त्वरीत जावुन त्रृटींची पुर्तता करुन दयावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना त्वरीत चुकारे अदा करता येतील.    |    महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभागाकडील वर्ग २ (ब) किंवा वरील वर्गातील नोंदणीकृत विद्युत ठेकेदारांकडुन खालील कामाकरीता ब-१ नमुन्यातील निविदा प्रणालीव्दारे (ऑनलाईन) मागवित आहेत.    |    कार्यालयीन पद्धतीने कामकाज करणे बाबत....    |   

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचा मुख्य उद्देश राज्यातील आदिवासींची आर्थिक पिळवणूक थांबवून त्यांचा विकास घडवून आणणे हा आहे. या उद्देशाच्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून महाराष्ट्र शासनाद्वारे २२ मार्च १९७२ मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये महामंडळाची स्थापना करण्यात आली.

महामंडळाची प्रमुख उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत...

  1. आदिवासी शेतकरी, आदिवासी कारागीर आणि आदिवासी भूमिहीन मजूर यांची आर्थिक पिळवणूक नाहीशी करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून कार्य करणे.
  2. आदिवासींच्या आर्थिक विकास संवर्धनासाठी प्रत्यक्ष सहाय्याच्या योजना हाती घेणे.

या प्रमुख उद्दिष्टांसोबतच खाली नमूद केलेल्या दुय्यम उद्दिष्ट साध्य करणे हे देखील महामंडळ स्थापन करण्यामागे शासनाचे धोरण आहे

  1. शेती जंगल व इतर उत्पादित मालाच्या विक्रीची तजविज करणे.
  2. आदिवासींची खाजगी व्यापार्यांकडून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी शेती, जंगल आणि इतर उत्पादित मालाच्या व शेतकऱ्यांच्या गरजेच्या वस्तुंची खरेदी व विक्री करणे.
  3. शेती माल व इतर माल आणि तदनुषंगिक माल व गरजेच्या वर यांची आयात, निर्यात आणि आंतरराज्य व्यापार स्वत: होऊन प्रवर्तित करणे
  4. निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य आणि इतर सक्षम अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने महाराष्ट्र राज्यात अथवा राज्याच्या बाहेर शाखा अगर विक्री केंद्रे किंवा एजन्सीज उघडणे.
  5. गुदामे अथवा शितगृहे भाड्याने घेणे आणि देणे, गुदामे व शितगृहे स्वतःच्या मालकीची करून साठवण्याची आणि उत्पादित मालाच्या विक्रीची सोय करणे. परवानाधारक वेअर हाउसमनचा धंदा करणे.
  6. चांगली बाजार व्यवस्था होण्यासाठी प्रक्रिया व उत्पादन कार्य हाती घेणे आणि त्यासाठी प्रकिया कारखाने उभारणे.
महत्वाच्या लिंक्स