आमच्याविषयी
महामंडळाची स्थापना, उद्दिष्टे आणि कार्यपद्धती.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचा मुख्य उद्देश राज्यातील आदिवासींची आर्थिक पिळवणूक थांबवून त्यांचा विकास घडवून आणणे हा आहे. या उद्देशाच्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून महाराष्ट्र शासनाद्वारे २२ मार्च १९७२ मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये महामंडळाची स्थापना करण्यात आली.
उद्दिष्टे
- आदिवासी शेतकरी, आदिवासी कारागीर आणि आदिवासी भूमिहीन मजूर यांची आर्थिक पिळवणूक नाहीशी करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून कार्य करणे.
- आदिवासींच्या आर्थिक विकास संवर्धनासाठी प्रत्यक्ष सहाय्याच्या योजना हाती घेणे.
- शेती, जंगल व इतर उत्पादित मालाच्या विक्रीची तजवीज करणे आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी खरेदी-विक्री करणे.
- गुदामे व शीतगृहे उभारून साठवण व विक्रीची सोय करणे आणि चांगल्या बाजार व्यवस्थेसाठी प्रक्रिया कारखाने उभारणे.
नेतृत्व
मा. श्री. देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री
मा. श्री. एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री
मा. श्रीमती. सुनेत्रा अजित पवारउपमुख्यमंत्री
मा. डॉ. अशोक रामाजी वुईकेमंत्री, आदिवासी विकास
मा. श्री. इंद्रनील नाईकराज्यमंत्री, आदिवासी विकास
मा. श्री. विजय वाघमारे (भा.प्र.से.)सचिव, आदिवासी विकास विभाग
मा. श्रीमती. लीना बनसोड (भा.प्र.से.)व्यवस्थापकीय संचालक

