विषयाकडे जा
महाराष्ट्र शासन · आदिवासी विकास विभाग

आधारभूत खरेदी योजना

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून देणारी योजना.

आधारभूत खरेदी योजना

सन २०२१-२०२२ मध्ये महामंडळाने आधारभूत किमत खरेदी योजने अंतर्गत केंद्र शासनाचे मंजूर हमी दराने धान व भरड धन्याचे एकूण वजन ४५३९७३०.६१ क्विंटल रक्कम रुपये १०८३२६.७१ लक्ष इतक्या किमतीचे खरेदी केली आहे.

सद्यस्थितीतील खरेदी हंगामाची आकडेवारी महामंडळाकडून प्रकाशित झाल्यावर येथे अद्ययावत केली जाईल. वर दिलेली आकडेवारी हंगाम २०२०-२१ व २०२१-२२ या दोन हंगामांची आहे.
खरेदी झालेला शेतमाल (हंगामनिहाय)
अ.क्र.वस्तूचे नाववजन (क्विंटल), हंगाम २०२०-२१किंमत (₹ लाख), हंगाम २०२०-२१वजन (क्विंटल), हंगाम २०२१-२२किंमत (₹ लाख), हंगाम २०२१-२२
१.भात४८८६१२८.६२११४५६४.८७४४७७३००.१७१०७०११.८८
२.मका२३०९८३.३३४१२४.५३४२६२६.५४७९३.७८
३.ज्वारी२१९७०.६४५६६.६९१९०४१.००५०५.९७
४.गहू०.०००.००७६२.९०१५.०७
एकूण५१३९०८२.५९११९२५६.०९४५३९७३०.६११०८३२६.७०

आधारभूत भांडार व हस्तांतरण

आधारभूत योजनेत खरेदी झालेला धान भरडाई करून त्याचा सी.एम.आर. तांदूळ विकेंद्रित खरेदी योजनेत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अधिनस्त गोदामात जमा करेपर्यंतची जबाबदारी अभिकर्ता संस्थेवर आहे. ज्वारी व मका हे भरड धान्य संबंधित जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिनस्त गोदामात जमा करण्यात आले आहे.

भांडारण व हस्तांतरण (हंगामनिहाय)
अ.क्र.वस्तूचे नाववजन (क्विंटल), हंगाम २०२०-२१किंमत (₹ लाख), हंगाम २०२०-२१वजन (क्विंटल), हंगाम २०२१-२२किंमत (₹ लाख), हंगाम २०२१-२२
१.भात५५०.३०३.३७७७८४६.२४५४४.९८
२.ज्वारी२१७२२.१४६२९.७७१४१७१.१५४०२.२८
३.तांदूळ (सी.एम.आर.)२४५३५६९.१०९७२०५.०१३५८६१४९.३०१३१३१०.९५
४.मका२१३५०२.६७४०५०.४१५६९०५.१०११३६.६७
५.गहू०.०००.००७६२.९०१६.५७
एकूण२६८९३४४.२११०१८८८.५६३७३५८३४.६९१३३४११.४६

कौशल्य विकास प्रशिक्षण

अनुसूचित जमातीच्या युवकांसाठी अल्पमुदत कौशल्य प्रशिक्षण (STT), उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) व पूर्वज्ञान मान्यता (RPL) यांच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार संधी.

या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संस्थांच्या निवडीबाबतची सद्यस्थितीतील निविदा "निविदा" विभागात पहा.

पात्रता

  • अनुसूचित जमातीचे युवक व युवती